Thu, Nov 15, 2018 18:51होमपेज › Belgaon › अमावस्येच्या ‘उतार्‍याची’  प्राध्यापकांनी केली सफाई

अमावस्येच्या ‘उतार्‍याची’  प्राध्यापकांनी केली सफाई

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:40PMबेळगाव : प्रतिनिधी

अमावस्येला अंधश्रद्धेतूून टाकण्यात आलेले उतारे दोन प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन हटविले. यावेळी त्यांनी अंधश्रद्धेबाबतही प्रबोधन केले.अमावस्या, पौर्णिमेला अनेकांकडून तिकटी, चौक याठिकाणी नानाप्रकारचे उतारे टाकण्यात येतात. यामुळे अशा जागी नारळ, कोहाळे, लिंबू, काळा धागा, बाहुल्या, गुलाल घातलेला भात दिसून येतो. 

शनिवारी प्रा. भरमा कोलेकर सकाळी 9 वा. कॉलेजला निघाले होते. त्यावेळी त्यांना टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट  येथे उतार्‍याचे ढीग पडलेले दिसून आले. याठिकाणी ये-जा करणार्‍यांकडून हे भीतीयुक्‍त उत्सुकतेने पाहण्यात येत होते.  यावेळी प्रा. कोलेकर यांनी उतारे हटविण्यास  पुढाकार घेतला. प्रा. मयूर नागेनहट्टी यांच्या सहाय्याने त्याठिकाणी टाकण्यात आलेले कोहाळे, लिंबू, मडके, काळा धागा जमा केला  आणि त्याची विल्हेवाट लावली. 

याबाबत माहिती देताना प्रा. कोलेकर म्हणाले, उतारे टाकून कोणतीही अडचण दूर होत नाही. अथवा विकार कमी होत नाही. त्यासाठी अंधश्रद्धा कमी होणे आवश्यक आहे.

URL : professor, cleans, superstition, utara, college, belagon news