Thu, Jun 20, 2019 01:10होमपेज › Belgaon › वॉर्ड १४ मध्ये सुविधांची वानवा

वॉर्ड १४ मध्ये सुविधांची वानवा

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:10PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

वॉर्ड 14 मध्ये येणार्‍या देवांग मुख्य रस्त्यावरील क्रॉस 1 ते 7 मध्ये मूलभूत सुविधा नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवकांनी भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सुविधा पुरविण्याची मागणी रहिवाशांनी केली. भाजप कार्यकर्ते पांडुरंग धोेत्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांच्या नावे शिरस्तेदारांना निवेदन देण्यात आले. 

देवांग मुख्य रस्त्याचे 15 वर्षापासून डांबरीकरण झालेले नाही. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. क्रॉस 1 ते 7 मध्ये जवळपास 2 हजारपेक्षा अधिक नागरिक राहतात. त्यांंना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पाणी पुरवठ्यासाठी बोअरवेल असूनही सोय केलेली नाही. ड्रेनेज वारंवार तुंबत असल्याने समस्या निर्माण होत आहे. क्रॉस 2 मधील नागरिकांनी बोअरवेलचे पाणी थेट घरोघरी घेतले आहे. क्रॉस 3 ते 4 मध्ये बोअरवेल असूनदेखील पाईपलाईन नसल्याने व्यवस्था निरुपयोगी ठरत आहे. पाईपलाईनने पाण्याचा पुरवठा करावा. भुयारी गटारी कराव्यात. पथदीप व्यवस्थित नसल्याने रात्री नागरिकांना ये-जा करताना धोका आहे. 

वीज खांबाना असलेले स्विचबोर्ड नागरिकांसाठी धोकादायक आहेत. बोर्ड लहान मुलांच्या हाताला लागू नयेत, याची दखल घेऊन स्विचबोर्ड अधिक उंचीवर बसवावेत. मनपाने  दखल घेऊन विकासकामे राबवावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यल्लाप्पा तिगडी, बोजप्पा हजेरी, देवेंद्र एकबोटे, कांबळे, प्रेमा एकबोटे, सावित्री कांबळे, प्रेमा हजेरे व नागरिक  उपस्थित होते.