Mon, Aug 19, 2019 07:37होमपेज › Belgaon › बेळगावमध्ये निवडणुकीच्या काळात कुकरचा ट्रक जप्‍त

बेळगावमध्ये निवडणुकीच्या काळात कुकरचा ट्रक जप्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचे छायाचित्र असलेल्या प्रेशर कुकरनी भरलेला ट्रक निवडणूक अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहितेचा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. तर सायंकाळी त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर छापा टाकून साहित्य जप्त करण्यात आले.

सदाशिवनगर येथील जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाजवळ ट्रक पकडण्यात आलो. कुकर बॉक्सवर लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चित्र आहे. 

हा ट्रक अडवून भाजप नेते अ‍ॅड. अनिल बेनके यांनी निवडणूक अधिकार्‍यांना माहिती दिली. पण अधिकारी तातडीने न आल्याने  गोंधळ माजला. अ‍ॅड. बेनके व हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज यांच्यामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक रोखून धरला व वाद शमवला. रस्त्यावर हा प्रकार घडल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

काही वेळानंतर निवडणूक  अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पुन्हा निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नातेवाईकांच्या हनुमाननगर येथील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. सदर अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलेले गॅस शेगडी, इस्त्री आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
 


  •