Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Belgaon › कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेऊ

कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेऊ

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:56PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून अलोककुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी अपघाताच्या घटना रोखण्याबरोबरच कायदा-सुव्यवस्थेची विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.

आयजीपी कार्यालयात अलोककुमार यांनी पदभार स्वीकारला. आयुक्त डी. सी. राजाप्पा, जिल्हा पोलिसप्रमुख रविकांतेगौडा, उपायुक्त सीमा लाटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना अलोककुमार म्हणाले, . उत्तर विभागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देऊन रहदारीला चांगले वळण देणे, दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात सक्तीचे धोरण अवलंबिणे यावर भर असेल. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना हाती घेऊ. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उत्तर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील.