Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Belgaon › अनैतिक संबंधातून एकाचा खून

अनैतिक संबंधातून एकाचा खून

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:27PMबेळगाव : प्रतिनिधी

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणार्‍याला शिवीगाळ केल्याच्या रोषातून पतीलाच ठार मारण्यात आल्याची घटना खैतनाळ (ता. गोकाक) येथे रविवारी रात्री उशिरा घडली. यल्लाप्पा सिद्धराम बाळनाईक  (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची गोकाक ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. 

खैतनाळ यल्लाप्पा बाळनाईक याच्या पत्नीशी गावातीलच हालसिद्ध व्हळ्याप्पा हणमसागर या व्यक्तीचे अनैतिक संबंध होते. यामुळे अस्वस्थ असलेल्या यल्लाप्पाने हालसिद्धला शिवीगाळ केली होती. शिवीगाळ केल्याच्या रागातून हालसिद्धने यल्लाप्पाला जबर मारहाण केली होती. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रविवारी रात्री उशिरा जिल्हा इस्पितळात आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. 

याबाबत यल्लाप्पा बाळनाईक याचे भाऊ अर्जुन याने हालसिद्ध हणमसागर यासह चार जणांविरोधात गोकाक ग्रामीण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. संशयित बेपत्ता असून सीपीआय सी. किरण प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी शमा मिश्रा अधिक तपास करीत आहेत.