Sat, Jun 06, 2020 07:42होमपेज › Belgaon › ट्रकने ठोकरल्याने २ दुचाकीस्वार ठार

ट्रकने ठोकरल्याने २ दुचाकीस्वार ठार

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:10PMरामनगर : वार्ताहर 

अनमोड - हेमाडगा - खानापूर मार्गावर वर्लेवाडीजवळ मोटारसायकलला  ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायं. 4 च्या सुमारास घडली. वनखात्याच्या गेटवर काम करणारा वॉचमन मोहन दुलबा देसाई (वय 40, रा.वर्लेवाडी) आणि पटला येथील कृष्णा फटू गुरव (मेस्त्री) (30) अशी मृतांची नावे आहे.

हे दोघेही घराकडे जात असताना अनमोडहून हेमाडगामार्गे खानापूरला जाणार्‍या ट्रकने धडक दिल्याने दोघेही मोटारसायकलस्वार रस्त्याच्या बाजूला उडून पडले आणि जागीच ठार झाले. ट्रकचालक फरार झाला आहे. 

अपघाताचे वृत्त समजताच रामनगर पीएसआय चंद्रशेखर हरिहर, सहकारी रामय्या पुजारी, सुधाकर नाईक आदींसह अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामनगर सरकारी  दवाखान्यात पाठवून दिले.