होमपेज › Belgaon › रेल्वेच्या धडकेत वृद्ध ठार

रेल्वेच्या धडकेत वृद्ध ठार

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:27PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

रविवार सकाळची वेळ, टिळकवाडीतील पहिले रेल्वेगेट बंद होते. फटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची गर्दी. एका बाजूने रेल्वे येत होती. याच वेळी एक वृद्ध फाटक ओलांडून रुळावरून जाताना दिसला. अनेकांनी त्यांना ओरडून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचेही ऐकून न घेता त्यांनी रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी रेल्वेची त्याला धडक बसून ते जागीच ठार झाले. 

या घटनेमुळे खळबळ उडाली. वृद्धाने आत्महत्या केल्याची माहिती पसरली. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. सावरकर रोड येथील अप्पासाहेब बाबू डब्बा (वय  76) असे त्यांचे नाव आहे. कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.