Sun, May 26, 2019 00:59होमपेज › Belgaon › बेळगाव : काकतीजवळ बस-ट्रॅक्टर अपघात १ ठार  

बेळगाव : काकतीजवळ बस-ट्रॅक्टर अपघात १ ठार  

Published On: Dec 08 2017 8:48AM | Last Updated: Dec 08 2017 8:48AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळुरु राष्‍ट्रीय महामार्गावर आराम बस आणि ट्रक्‍टरची धडक होवून झालेल्‍या अपघातात एक जण ठार झाला. तर, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगावातील सरकारी रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. काकती पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

बेंगळुरूवरून पुण्याकडे जणाऱ्या आराम बसने (क्र. पी. वाय. ०५ ए. ३७०९ ) ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकटरला पाठिमागून धडक दिली. यात बसचा किन्नर गंभीर जखमी झाला. त्‍याला उपचारासाठी रुग्‍णालयात नेत असताना वाटेतच त्‍याचा मृत्‍यू झाला. तर, बसमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांच्यावरत बेळगाव येथील सरकारी रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत पुढील तपास काकती पोलिस ठाण्याचे फौजदार रमेश गोकाक  करीत आहेत.