Wed, Apr 24, 2019 11:49होमपेज › Belgaon › नोकरीच्या आमिषाने लुबाडणार्‍याला अटक

नोकरीच्या आमिषाने लुबाडणार्‍याला अटक

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:58PMजमखंडी : वार्ताहर

भारतीय सेनेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक युवकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडल्या-प्रकरणी विठ्ठल कल्लाप्पा इंगळी (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. 
जमखंडी तालुक्यातील हुन्नूर येथे ध्रुव आर्मी कोचिंग अकॅडमी सुरु करुन युवकांना भुरळ पाडून भारतीय सेनेत नोकरी देण्याचे आमिष दाखविल्याने अनेक युवक यात अडकले. त्यांच्याकडून प्रथम कांही रक्‍कम घेऊन नोकरी आदेश येताच चार लाख रुपये देण्याचा त्यांच्याबरोबर करार करुन पोस्टाने नियुक्तीचे बनावट पत्र पाठवून लुबाडले.