Sat, Mar 23, 2019 16:38होमपेज › Belgaon › आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:15AM

बुकमार्क करा

चिकोडी : (प्रतिनिधी)  

घरातील दिवा पडून लागलेल्या आगीत वृध्दाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मुगळी येथे घडली. देवाप्पा दंडीन्नवर (वय 65) असे त्याचे नाव आहे. यात घरही खाक झाले. 
घरात देवप्पा राहत होते. विजेचे कनेक्शन नसल्यामळे रात्री घरात दिवा लावून झोपले होते. दिवा पडून आग लागली. थोड्याच वेळात घराला आगीने पेट घेतला.  देवाप्पा यांना  लवकर न कळल्यामुळे त्यांच्यावर घराचे छत कोसळले. यात त्यांचा अंत झाला. देवाप्पा काही वषार्ंपासून मुलांपासून विभक्त होऊन येेथे राहत होते. घटना सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली. घटनास्थळी चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, आरोग्य खात्याचे अधिकारी, पीएसआय संगमेश होसमनी भेट दिली.