Sun, Mar 24, 2019 12:43होमपेज › Belgaon › गोटूरनजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

गोटूरनजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

Published On: Jan 31 2018 5:29PM | Last Updated: Jan 31 2018 5:29PMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटूरनजीक दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती, पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास झाला. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, दुचाकीच्या अपघातात मरण पावलेले दाम्पत्य हे खणदाळ (ता.गडहिंग्लज) येथील आहे. अपघातस्थळी संकेश्‍वरचे फौजदार एच.डी.मुल्ला यांनी भेट देवून पुढील तपास सुरू केला आहे.