Fri, Jul 19, 2019 22:45



होमपेज › Belgaon › निपाणीत डीसीआयबीची बेकायदा वाळू वाहतूकीवर कारवाई

निपाणीत डीसीआयबीची बेकायदा वाळू वाहतूकीवर कारवाई

Published On: Jan 21 2018 7:28PM | Last Updated: Jan 21 2018 7:28PM



निपाणी : प्रतिनिधी

जिल्हा गुन्हे अन्वेषण (डीसीआयबी) विभागाच्या भरारी पथकाने रविवारी निपाणीत बेकायदा वाळु विरोधी धडक कारवाई केली. यावेळी पथकाने निपाणी अकोळ रोडवर लखनापूरकडे  ट्रकमधून वाळु घेवून जाणार्‍या चालक संदिप बाळासाहेब पाटील (वय 28) रा.वडकशिवाले ता.करवीर याला अटक करून, वाहनांसह 18 लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुपारी 4 च्या सुमारास झाली. 
अधिक माहिती अशी की, ट्रक क्रं.एम.एच.09 सी.यु.5056 मधून मेतके ता.कागल येथून चालक पाटील हा 7 ब्रास वाळु घेवून लखनापुरकडे जात असल्याचे खास खबर्‍याकडुन पथकाला समजले. त्यानूसार जिल्हा पो. प्रमुख .बी.आर.रवीकांत गौडा यांच्या मागदर्शनाखाली या विभागाचे सीपीआय एस.आर.कट्टीमनी,फौजदार धर्माकर धर्मट्टी, हावलदार एस.सी.अंबरशेट्टी, अशोक बजंत्री, एल.एन.कुंभारे, गणपती लमाणी आदींनी निपाणी अकोळ मार्गावर सापळा लावला. यावेळी आंबा मार्केट रोड मार्गे चालक पाटील हा ट्रक घेवून लखनापुरकडे चालला असल्याचे दिसून आले.

त्यानुसार साईशंकर नगर क्रॉसवर पथकाने सदर चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. चौकशीअंती ट्रकमध्ये 7 ब्रॉस वाळु असल्याचे दिसून आले. यावेळी चालकाकडे कागदत्राची मागणी केली असता, ती मिळुन आली नाहीत. त्यामुळे पथकाने बेकायदा खनीज संपत्ती उत्खनन कायद्याअंतर्गत कारवाई करून हा गुन्हा बसवेश्‍वर चौक पोलिस निपाणीकडे वर्ग केला. पुढील तपास फौजदार बी.वाय.बेटगेरी हे करीत आहेत.