Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Belgaon › भीषण अपघात; माय-लेकी ठार

भीषण अपघात; माय-लेकी ठार

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:52AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर हॉटेल साई पॅलेसनजीक कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या  भीषण अपघातात आईसह दोन मुली ठार झाल्या तर तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास ही दुर्घटना घडली असून शहर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सावित्री गुलाबचंद गुप्ता (वय 48), शोभा रवी गुप्ता (26), आरती गुलाबचंद गुप्ता (20) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमी नीलेश गुलाबचंद गुप्ता (वय 28), रवी मोहनलाल गुप्ता (29), चालक सूर्य ग्यानचंद शाहू (25, सर्व रा. हरियाली व्हिलेज, शाबू डिसोजा कंपाऊंड, टागोर नगर विक्रोळी ईस्ट, मुंबई) यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातातील मयत एअर टेक्नोशिएन झालेल्या शोभा हिची माहीम येथील मैत्रीण अलीकडेच गोवा येथे राहावयास गेली आहे. शोभाला तिच्या मैत्रिणीने 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी गोव्याला बोलाविले होते. नियोजनाप्रमाणे हे सर्वजण 30 रोजी सर्वजण गोव्यात पोहोचले. 

31 रोजी पर्यटन केल्यानंतर शोभा यांच्या मैत्रिणीच्या घरी सर्वांनी रात्री 31 डिसेंबरची पार्टी साजरी केली. तर सोमवार दि.1 रोजी दुपारपर्यंत देवदर्शन व काही ठिकाणांना भेटी देऊन  रात्री 12 च्या सुमारास गोव्याहून निघाले. त्यांची कार तवंदी घाट उतारानजीकच्या हॉटेल साई पॅलेसनजीक आली असता चालक सूर्य याचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारची रस्त्याकडेला असलेल्या झाडास जोराची धडक बसली. यावेळी चालकाशेजारी बसलेल्या सावित्री यांचा जागीच मृत्यू झाला.  

शोभा व आरती यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्‍तस्त्राव झाला असल्याने त्यांचाही मृत्यू झाला.