Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Belgaon › निपाणीत अखेरच्या दिवशी ९२ उमेदवारी अर्ज

निपाणीत अखेरच्या दिवशी ९२ उमेदवारी अर्ज

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 18 2018 11:09PMनिपाणी : प्रतिनिधी

ढोल-ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, समर्थकांकडून घोषणा व दुचाकी रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत येथील नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी 92 उमेदवारांनी विविध वॉर्डातून अर्ज दाखल केले. 

शुक्रवार दि.10 पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. शेवटच्या दिवसापर्यंत 159 उमेदवारांचे अजर्ं आले आहेत. वॉर्डनिहाय आलेले अर्ज पुढीलप्रमाणे- वॉर्ड क्र. 1 सुजाता कदम, वॉर्ड क्र. 2 विनायक कमते, राजेंद्र शाह, आशिष मिरजकर, वॉर्ड क्र. 3 मिलींद चौगुले, संजय सांगावकर, वॉर्ड क्र. 4  उत्तम कामते, प्रभाकर सडोलकर-भाटले, वॉर्ड क्र. 5 अविनाश सांगावकर, संतोष सांगावकर, वॉर्ड क्र. 6 गीता धडके, रेश्मा धडके, प्रभावती सूर्यवंशी, देविका कांबळे, सुषमा पोळ, वॉर्ड क्र. 7 गीता पाटील, वॉर्ड क्र. 8 सोनल कोठडिया, पल्लवी गुरव, स्वाती गुरव, वॉर्ड क्र. 9 मेघा विकास वासुदेव, राणी शेलार, योगिता कांबळे, वॉर्ड क्र. 10 पांडुरंग चव्हाण, सुहास सूर्यवंशी, राजू भगत, विठ्ठल वाघमोडे, भरत कुरबेट्टी, वॉर्ड क्र. 11 ज्योती प्रशांत चिकोर्डे, दीपाली गिरी, रेखा बागडे, वॉर्ड क्र. 12 संध्या खडके, रंजना इंगवले, वॉर्ड क्र. 13 संगीता सचिन चौगुले, वॉर्ड क्र. 14 निलम सुळकुडे, सर्जेेराव नाईक, वॉर्ड क्र. 15 अर्चना औंधकर, नगिना मुल्ला, वॉर्ड क्र. 16 सतीश कांबळे, जसराज गिरे, मुरारराव देसाई, वॉर्ड क्र. 17 धनाजी निर्मळे, राजू परिट, महादेव चव्हाण, गणेश जाधव, संजय पावले, वॉर्ड क्र. 18 विनायक वडे, रामचंद्र निकम, वॉर्ड क्र. 19 इम्तियाज काझी, उदय नाईक, सैफुल पटेल, वॉर्ड क्र. 20 अजय माने, संजय जंगी, संतोष माने, अनिल श्रीखंडे, गजेंद्र पोळ, दिलीप कांबळे, अरूण दाभाडे, वॉर्ड क्र. 21 सुरैय्या बागवान, गुलनाझ पकाली, अरूणा मुदकुडे, वॉर्ड क्र. 22 सद्दाम नगारजी, दिलीप घाटगे, सलीम नगारजी, रविंद्र लाड, पूनम लाड, विनोद जाधव, सर्फराज कोल्हापुरे, संजीव कोकरे, महमंदहनीफ अत्तार, भारत पाटील, वॉर्ड क्र. 23 हयातगुलखान पठाण, सर्फराज बडेघर, परवीन नाईकवाडी, जरारखान पठाण, फारूक गवंडी, मधुसुदन चिकोडे, वॉर्ड क्र. 24 सुनीता गाडीवड्डर, वॉर्ड क्र. 25 नीता बागडे, सुनीता गाडीवड्डर, वॉर्ड क्र. 26 मोनिका हसुरे, वॉर्ड क्र. 27 नवनाथ चव्हाण, आकाश माने, वॉर्ड क्र. 28 जायेदा कलावंत, नजहतपरवीन मुजावर, अमिना मकानदार, वॉर्ड क्र. 29 कावेरी मिरजे, वॉर्ड क्र. 30 संजिवनी अनिल शारबिद्रे, शांता प्रकाश  पांडव, वॉर्ड क्र. 31 सुनीता गाडीवड्डर, शशिकांत कांबळे. सोमवार दि. 20 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. गुरूवार दि. 23 पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.