Wed, Jan 22, 2020 23:15होमपेज › Belgaon › ‘मराठी’विरोधकांना रोखण्याची गरज

‘मराठी’विरोधकांना रोखण्याची गरज

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:52PM

बुकमार्क करा

आंबेवाडी : वार्ताहर

आपली मराठी भाषा व मराठी संस्कृती पुसून टाकण्याचे काम सुरू आहे. स्वाभिमानी जनतेने हा ठेवा जपला आहे. त्यामुळे संस्कृती पुसून टाकणार्‍यांना रोखण्याची गरज आहे. मराठी संस्कृती  आमचा अभिमान असल्याने आम्हाला तातडीने महाराष्ट्रात विलीन करण्यात यावे, असे विचार मराठी नेत्यांनी शनिवारी मराठी शाळेच्या शताब्दी महोत्सवात मांडले. 

आंबेवाडी (ता. बेळगाव) सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांनी केले. त्यावेळी आ. अरविंद पाटील म्हणाले, शेजारचा मुलगा इंग्रजी शिकतोय म्हणून स्वत:च्या मुलाला तुम्ही इंग्रजी शाळेत पाठवू नका. सीमाभागातील मराठी टिकविण्यासाठी मराठीतून शिक्षण गरजेचे आहे. त्यामुळेच मराठी शाळा टिकतील. तुमची-आमची ओळख टिकवायची असेल, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्या टिकविण्यासाठी मराठीला विरोध करणार्‍यांना बाजूला सारा.

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, इंग्रजीच्या दिखाऊपणाला भुलू नका. मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान जपा. मराठी भाषेतून शिक्षण घेणारे अनेकजण उच्च पदावर आहेत. 

शताब्दी सोहळ्यानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. शताब्दी फलक, कमान, नूतन खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शांताई वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक नागेश चौगुले होते. खा. सुरेश अंगडी, जि.पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष मोहन मोरे, जि.पं. सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, तानाजी पाटील, माजी महापौर विजय मोरे, प्रकाश बेळगुंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.