होमपेज › Belgaon › बेळगाव येथे  १७ रोजी नौदल दिन कार्यक्रम

बेळगाव येथे  १७ रोजी नौदल दिन कार्यक्रम

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:45AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भारतीय नौदलातर्फे दि. 17 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत लिंगराज कॉलेज मैदानावर नौदल दिन कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. 1971 च्या भारत-पाक युध्दामध्ये नौदलाने जी गौरवास्पद कामगिरी केली तो नाविक दलाचा विजय दिन म्हणून साजरा केला जातो.

या कार्यक्रमामध्ये बेळगाव जिल्ह्यातील नाविक दलाचे माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी सदस्य सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला आयएनएस कदंबा कारवार येथून नौदलाचे बँडपथक येणार आहे. त्यांच्यावतीने देशभक्तीपर शौर्यगीते व लोकप्रिय गीते सादर केली जाणार आहेत. तरुणांनी नौदलात भरती होऊन देशसेवा करावी हा उद्देश या कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नाविक दल संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील व कार्यवाह राजीव साळुंखे यांनी केले आहे.