Sun, Feb 24, 2019 00:28होमपेज › Belgaon › पंतप्रधान मोदी आज बेळगाव,चिकोडीत

पंतप्रधान मोदी आज बेळगाव,चिकोडीत

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 1:07AMबेळगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगऴवार 1 मे रोजी जिल्हा दौर्‍यावर येत  आहेत. चिकोडीत सायंकाळी 6 वाजता त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींचे मंगळूरहून सायंकाळी 5.20 वाजता सांबरा विमानतळावर आगमन होईल. तेथून हेलिकॉप्टरने ते चिकोडीला रवाना होतील.

प्रचारसभा आटोपून ते पुन्हा बेळगावला परत येतील. त्यांच्या दौर्‍यावेळी सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही त्रुटी भासू नयेत, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना शहर पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस प्रमुखांना प्रादेशिक आयुक्त सुनीलकुमार यांनी केली आहे. मोदींच्या सभेसाठी 7 जिल्ह्यातील 1100 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.