Sun, Sep 23, 2018 22:24होमपेज › Belgaon › बैठकीतच मद्यपीच्या हल्ल्यात तरुण ठार

बैठकीतच मद्यपीच्या हल्ल्यात तरुण ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंकली : महावीर जयंतीची बैठक सुरू असताना, जैन बस्तीमध्ये मद्य पिऊन धिंगाणा घालू नको, असे समजावून सांगणार्‍यावर  मद्यपी युवकाने खुरप्याने वार केल्यामुळे भरत धनपाल दुग्गे (वय 42) यांचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी मोळवाड (ता. अथणी) येथे घडली. 

वर्धमान भूपाल ऐतवाडे (वय 42) असे हल्लेखोराचे नाव असून, त्याला ग्रामस्थांनी जेरबंद करून कागवाड पोलिसांच्या हवाली केले आहे. मोळवाड (ता. अथणी) येथील जैन समाज बांधवांतर्फे महावीर जयंतीसाठी गावातील जैन बस्तीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  


  •