Tue, Apr 23, 2019 19:48होमपेज › Belgaon › कार-दुचाकी अपघातात कुरणीचे मायलेक ठार

कार-दुचाकी अपघातात कुरणीचे मायलेक ठार

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 11:37PMदड्डी : वार्ताहर

पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर मणगुत्ती (ता. हुक्केरी) क्रॉस येथील धाब्याजवळ मंगळवारी रात्री 9.30 वा. कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कुरणी (ता. हुक्केरी) येथील मायलेक जागीच ठार 
झाले.

मंगळवारी रात्री कुरणी येथील तरुण चेतन होन्नाप्पा लोळसूर (वय 25) हा दुचाकीस्वार आई दान्नम्मासह (40) मणगुत्तीकडे जात होता. चेतनच्या पुढे टँकर होता. मधोमध चेतनची दुचाकी व मागून कार येत होती. यावेळी कारची चेतनच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यात चेतन व दान्नम्मा जागीच ठार झाले. कार भरधाव असल्याने दुचाकी फरफटत गेली. यात चेतनच्या डोक्याला व छातीला मोठा मार बसला.  

घटनास्थळी तातडीने यमकनमर्डी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. या घटनेने कुरणी गावावर शोककळा पसरली आहे.