Fri, Jul 19, 2019 01:46होमपेज › Belgaon › निपाणी पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध

निपाणी पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 1:32AMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीला मंगळवारी तहसीलदारांनी मंजुरी दिली. या याद्या वॉर्डवार प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांनी 27 जूनपर्यंत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन आयुक्‍त दीपक हरदी यांनी केले आहे.

शहरात 31 वॉर्ड असून शुक्रवारी शासनाने वॉर्डवार आरक्षण व वॉर्ड पुनर्रचना जाहीर केली होती. आता पुनर्रचित वॉॅर्डाची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांना मतदार यादी पाहता यावी याासाठी झेरॉक्स प्रत देण्याची सोय पालिकेने केली आहे. शहरात 31 वॉर्डात 49 हजार 932 मतदार आहेत.  सायंकाळी मतदारयादी घेण्यासाठी पालिकेत गर्दी झाली होती. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या आरक्षणाला हरकती दाखल करण्यासाठी बुधवार (13 जून) हा अंतिम दिवस आहे.