Mon, Jun 24, 2019 16:42होमपेज › Belgaon › म्हादई समस्या निकालात काढा; अन्यथा आत्महत्येचा इशारा

म्हादई समस्या निकालात काढा; अन्यथा आत्महत्येचा इशारा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:00AM

बुकमार्क करा

हुबळी : प्रतिनिधी

म्हादई पाणी समस्या तातडीने निकालात काढा अन्यथा भाजप कार्यालयासमोर व नेत्यांच्या निवासस्थानासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना व इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

म्हादई आंतरराज्य पाणीवाटप समस्या तातडीने निकालात काढावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व इतर संघटनांच्या वतीने हुबळी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शेतकर्‍यांनी हा इशारा दिला.

‘म्हादई’चे पाणी वळवून ते ‘मलप्रभा’त सोडावे, या आंदोलनामध्ये ज्या शेतकर्‍यांचा मृत्यू झाला व जे जखमी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, शेतकर्‍यांवर भरलेले फौजदारी खटले मागे घेण्यात यावेत, कृषीमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकर्‍यांसाठी कल्याण योजना राबवाव्यात, या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना उद्देशून तहसीलदारांना देण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी 15 दिवसांत म्हादई योजना निकालात काढण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्याची पूर्तता त्यांनी केली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘म्हादई’ प्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनामध्ये वीरेश सोबरदमठ, शंकर अंबाली, गुरू रायनगौडा, मल्लन्ना आलेकर, आयप्पा शिरकोळ व इतरांचा समावेश होता.