Fri, Jan 18, 2019 07:23होमपेज › Belgaon › मायाक्कादेवी यात्रोत्सव आजपासून; रविवार यात्रेचा मुख्य दिवस

मायाक्कादेवी यात्रोत्सव आजपासून; रविवार यात्रेचा मुख्य दिवस

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 10:49PMरायबाग ः प्रतिनिधी 

कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या रायबाग तालुक्यातील चिंचली येथील श्री मायाक्कादेवीचा यात्रोत्सव बुधवार दि. 31 जानेवारीपासून सुरू होऊन 9 फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे.  रविवार दि. 4 फेबु्रवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्री मायाक्का देवीला महानैवेद्य (बोनी कार्यक्रम) आणि रात्री नेत्रदीपक पालखी उत्सव होणार आहे, अशी माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जितेंद्रसिंह जाधव चिंचलीकर सरकार यांनी दिली. 

यात्राकाळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. यात्रेकरुंसाठी खास बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. लाखो भाविकांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिर आणि परिसरात विजेची व्यवस्था व पोलिसांसह सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात्राकाळात हालहळ्ळ दुधाच्या ओढ्याला विशेष महत्त्व असते. येथे लाखो भाविक स्नान करून देवीचे दर्शन घेत असतात. येथेही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून ओढ्यालाही पाणी सोडण्यात येणार आहे.