होमपेज › Belgaon › वर्‍हाडी टेम्पोला अपघात, महिला ठार 

वर्‍हाडी टेम्पोला अपघात, महिला ठार 

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 05 2018 12:02AMबेळगाव : प्रतिनिधी

संकेश्‍वर येथे लग्नसमारंभ संपवून  बेळगावमार्गे पंत बाळेकुंद्रीला जाणार्‍या वर्‍हाडी टेम्पोला महांतेश नगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 येथील ब्रिजजवळ अपघात होऊन महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. महबुबी हसनसाब सनदी (वय 60 रा. होनीहाळ) असे मृत महिलेचे नाव असून पाचजण जखमी झाले आहेत.

संकेश्‍वर येथील नातलगामधील लग्नसोहळा संपवून घरी परतत असताना  राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 येथील भुयारी मार्गात  टेम्पो  व ट्रकची टक्कर झाली. टेम्पोत समोर बसलेल्या महबुबी सदनी  यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल कण्यात आलेे. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमा प्रकाश तवार (वय 10) मलप्रभा कृष्णा कोलकार (वय 60 दोघीही रा. होनीहाळ) श्‍वेता बाबू कांबळे  (वय 19) नंदा गंगाधर कोलकार (वय 42 ) मारुती यल्लाप्पा कोलकार (वय 36 दोघेही रा. पंतबाळेकुंद्री) अशी जखमींची नावे आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी माळमारुती पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.