Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Belgaon › मॅरेथॉन स्पर्धेत 600 स्पर्धकांचा सहभाग

मॅरेथॉन स्पर्धेत 600 स्पर्धकांचा सहभाग

Published On: Mar 07 2018 11:18PM | Last Updated: Mar 07 2018 9:35PMजमखंडी : वार्ताहर

एम. आर. एन. निराणी फाऊंडेशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत अंदाजे 600 स्पर्धकांनी भाग घेतला. येथील एस. आर. ए. क्‍लबजवळ स्पर्धेचे उद्घाटन मुत्तीनकंती मठाचे श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामींनी केले. माजी मंत्री मुरगेश निराणी, फाऊंडेशन प्रमुख संगमेश निराणी, डॉ. उमेश महाबळशेट्टी, काडू माळी, जी. के. मठद, एन. एस. देवरवर, बी. के. कोण्णूर, योगप्पा सवदी आदी उपस्थित होते. 
6.9 कि. मी. मॅरेथॉन दौडला एस. आर. ए. सर्कलपासून प्रारंभ करण्यात येईल. देसाई सर्कल, प. भा. रोड, उमारामेश्वर रोड, अडत बाजार, हनुमान चौक, पोस्ट चौक, थिएटर चौक, अशोक सर्कल, कडपट्टी क्रॉस, रामेश्वर कॉलनी, सज्जी हनुमानमार्गे तालुका क्रीडांगणावर दौड पोहोचली. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-खुला गट अनुक्रमे - अमित पाटील (निपाणी), राजू ऐनापूर (कोल्हापूर), अस्लम सुलतानपूर (महाराष्ट्र), राळू पिरगण्णवर (मुरगोड), गिरीश तेली (साई स्पोर्टस्, बंगळूर), प्रकाश तळगडे (कोल्हापूर), शिवानंद मल्लमनवर (हारुगेरी), इरप्पा हलगण्णावर (जमखंडी), राघवेंद्र गदग. 

20 वषार्ंखालील अनुक्रमे - सचिन बटकुर्की (कोण्णूर), अजय कोकटनूर (जमखंडी), किरण शिरहट्टी (जमखंडी), बसवराज लोकापूर (जमखंडी), महादेव सवणूर (जमखंडी), गोपाल अगसर (हिप्परगी), सागर बजंत्री (जमखंडी), इरण्णा बाडगंडी (जमखंडी), प्रकाश अनिगौडर (जमखंडी) 

40 वर्षांखालील अनुक्रमे - श्रीशैल सारवड बनहट्टी, रवि कवटेकर (हुल्याळ), नागराज कणबर (हिप्परगी), मंजू सांवी (जमखंडी), अस्लम मुल्ला (जमखंडी), बसवराज तुबची (मुत्तूर), रमेश झेंडे (जमखंडी), शिवू दुरवाडे (जमखंडी), संभाजी तुराटे (जमखंडी) 

60 वषार्ंखालील अनुक्रमे - आप्पासाब कडपट्टी (जमखंडी), लक्ष्मण राठोड (विजापूर), शिवराज गंजी (गुलबर्गा), अशोक रामदुर्ग, विजय कवटगी, चन्नाप्पा बिरादार, राजेसाब कडकोळ, टी. एम. कनवाड, संतोष वाघ (सर्व जमखंडी).

 60 वषार्ंवरील अनुक्रमे - एल. आय. पवार, सी. टी. मेघाडी, श्रीधर जोशी (सर्व जमखंडी), संग्राम दगड उचलणे स्पर्धेचा निकाल - करेप्पा अभुनवर (कोण्णूर), आनंद कदम (सवदी), सिद्दप्पा होसमनी (होसट्टी), आनंद अक्कीमरडी (मुधोळ).