Sat, Nov 17, 2018 20:34होमपेज › Belgaon › मराठी शाळा प्रवेशमोहिमेचे काय?

मराठी शाळा प्रवेशमोहिमेचे काय?

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:13PMबेळगाव : प्रतिनिधी

गेली 65 वर्षे अन्यायाने डांबलेला मराठी बहुभाषिक भाग महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने आणइ न्यायालयीन लढली जात आहे. मात्र याच सीमाभागात सरकारी मराठी शाळा वाचविण्यासाठी, मराठीतून कागदपत्रे मिळविण्यासाठी अपेक्षित कार्य झालेले नाही. 

खानापूर तालुक्यात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व धडपड शिक्षक मंचने तीन वर्षापासून सरकारी मराठी शाळा वाचविण्यासाठी उपक्रम राबवित आहे. त्या धर्तीवर मराठी शाळा वाचविण्यासाठी बेळगाव तालुक्यात कार्य होताना दिसत नाही.

निवडणूक झाल्यानंतर मराठी शाळा, कागदपत्रांच्या मागणीचा विसर पडतो. त्यामुळे मराठी टिकली पाहिजे, ती जगली पाहिजे यासाठी मराठी प्रेमी मंडळीनी पुढाकार घ्यायला हवा.

खानापुरात गेली तीन वर्षे मराठी टिकविण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यरत आहे. त्यातून धडपड शिक्षक मंच उदयाला येऊन सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन तालुक्यात मराठी शाळा वाचविण्यासाठी कार्य चालविले आहे. त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.  

यंदा सरकारी शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाने शाळा प्रवेश अभियान 16 मे पासून राबविले. त्यामध्ये शिक्षक, शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी यांचा सहभाग होता. मात्र पालकांचा खासगी शाळेकडे कल असल्याने यंदा सरकारी शाळेत प्रवेश घेतला नाही.