Thu, Feb 21, 2019 15:10होमपेज › Belgaon › बेळगावात सीमा मेळाव्याला सुरुवात

बेळगावात सीमा मेळाव्याला सुरुवात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी
संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मेळाव्याला बेळगावमधील ‘सीपीएड मैदाना’वर सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील बडी राजकीय मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहिली आहेत.

मेळाव्यास बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी भागातून हजारो सीमावासी मेळाव्यात सहभागी झाले आहेत. व्यासपीठावर डॉ. एन. डी.पाटील आणि शरद पवार यांच्याबरोबरच कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री आमदार जयंत पाटील देखील उपस्थित आहेत. 


  •