Sat, Jan 19, 2019 22:07होमपेज › Belgaon › ‘अभिजात’साठी राजकीय नेतृत्व ठरतेय खुजे! 

‘अभिजात’साठी राजकीय नेतृत्व ठरतेय खुजे! 

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:20AMबेळगाव : संदीप तारिहाळकर

मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी आणि भाषासंवर्धन, सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या भरघोस अनुदानाची गरज आहे. यासाठी मराठी भाषेला गरज आहे ती ‘अभिजात’ दर्जाची. मात्र, या सर्व प्रकारात महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वच खुजे ठरत आहे. मंगळवारी मराठी भाषा दिनी अभिजात दर्जा समितीचे समन्वयक डॉ. हरी नरके यांनी  कन्नड भाषिकांनी मराठीला अभिजात दर्जा मिळण्यापासून रोखण्यासाठी निकष बदलण्याचा दबाव आणला, अशी टीका केली होती. त्यानंतर या विषयाला तोंड फुटले आहे.

मराठी भाषेला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. हे केंद्र सरकारला ठासून सांगण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीच दुबळी ठरत आहे. अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, याबाबतचा अहवाल महाराष्ट्र तज्ज्ञ समितीने केंद्राकडे दाखल केला आहे. मात्र केंद्राने मराठीला पर्यायाने महाराष्ट्र आणि बारा कोटी मराठी जनतेला गेल्या पाच वषार्ंपासून झुलवत ठेवले आहे. 

देशात अनुक्रमे तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड या भाषांना अभिजात दर्जा मिळाला. या चारही भाषाप्रेमी नेत्यांनी अभिजातचे निकष बदलण्यासाठी केंद्राला साकडे घातले. याबाबत प्रा. डॉ. हरी नरके यांनी मराठीद्वेष्ट्यांबाबत संताप व्यक्त केला. बदललेल्या निकषांची पूर्तता करूनही केंद्राने दुर्लक्ष केले आहे.