Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Belgaon › शिनोळीत आज मराठ्यांचा एल्गार

शिनोळीत आज मराठ्यांचा एल्गार

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:43AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठा आरक्षण मागणीसाठी शिनोळी (ता. चंदगड) येथे रविवारी (दि. 29)  रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार ढिम्म असून त्याचा निषेध करण्यासाठी शिनोळीत आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगाव सकल मराठा समाजाने याला पाठिंबा दर्शविला आहे. बेळगावमधून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाबरोबर सीमाप्रश्‍नाची प्रमुख मागणी घेऊन सीमावासीयांनी या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. यासाठी मराठा मोर्चातील टी शर्ट, भगवी टोपी परिधान करून आंदोलनात सहभागी व्हावे. येथील धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 10 वाजता शिनोळीकडे मार्गस्थ व्हायचे आहे. समाजबांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. तरीदेखील महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्षच केले आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी शिनोळीत रास्तारोको करण्यात येणार आहे.