होमपेज › Belgaon › मंगसुळी खंडोबा यात्रेला 2 लाख भाविक

मंगसुळी खंडोबा यात्रेला 2 लाख भाविक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मंगसुळी : वार्ताहर

खंडोबा यात्रा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ‘येळकोट येळकोट घे घे’ या गजरात ‘लंगर (साखळी) 24 पेट्ट 3 री कडी’ अशी तुटली. भंडार्‍याच्या उधळणीत यात्रेकरूंनी आनंद लुटला.

यात्रेनिमित्त सोमवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्या हेात्याण यंदाची यात्रा सर्वसोयींनी युक्त अशी ठरली. दत्त कृषी अभिवृध्दी संघाच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय तसेच यात्रा कमिटीच्या सहकार्याने यात्रेकरूंना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. यात्रेत जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात होती. बैलांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली.

यात्रा करमुक्त केल्याने यात्रेकरूंना याचा फायदा घेता आला. यात्रेत हॉटेल्स्, रसवंती गृह, भेळवाले, कलिंगडाची रास पहावयास मिळाली. शीतपेय गृह, स्टेशनरी, कटलरी, भांडीवाले, पाळणा घर यांची रेलचेल दिसून आली. यात्रा कमिटीच्या वतीने व पोलिस पथकामुळे शिस्तीचे वातावरण दिसून आले.

सोमवारी नैवेद्य असल्याने मंदिरात कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रमधून आलेल्या भक्तांनी हजेरी लावली. मानकरी मंडळी व पुजारींच्या उपस्थितीत रात्री पालखी सोहळा, सासन काठी, सबेना, अश्‍व व वाघ्या मुरळी, दिवटीवाले यांनी प्रदक्षिणा घालून रात्र जागवली. पहाटे 4 वा. श्रीमंत सरकार घराणे, कुलकर्णी, पोलिस पाटील, शास्त्री बारा बलुतेदार यांच्या उपस्थितीत मानकरी शशिकांत वाघे यांनी साखळी तोडली साखळी 24 पेट्ट व तिसरी कडी अशी तुटली.

भाविकांनी भंडार्‍याची उधळण करून व येळकोट येयकोट घे घे अशी गर्जना करून यात्रेचा आनंद द्विगुणीत करून घेतला. काही भाविकांनी दिवटीला तेल पाजळवून आणि जागर घालून नवस फेडले. यात्रेतील जातीवंत जनावरांची निवड करून जातीवंत जनावरांना बक्षिसे देण्यात आली.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल सक्रोजी रविंद्र माळी, रविंद्र पुजारी, बाबासाहेब पाटील, चिदानंद माळी, परशराम सावंत, भानुसे, रविंद्र पाटील, दीपक कुटवाडे, राजू सराळे, आर. एन. बंगारप्पनवर, अजित चौगुले, सुधाकर भगत, एस. आर. सनदी, कमिटीचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम 
घेतले.


  •