Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Belgaon › मंगसुळीचे ता.पं.सदस्य दुचाकी अपघातात ठार

मंगसुळीचे ता.पं.सदस्य दुचाकी अपघातात ठार

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:11AM

बुकमार्क करा

मंगसुळी (वार्ताहर) :

अज्ञात बेदरकार वाहनाने दोन मोटार सायकलींना ठोकरल्याने झालेल्या अपघातात येथील रहिवासी आणि ता.पं. सदस्य मल्हारी कल्लाप्पा वाघमोडे (वय 34) हे जागीच ठार झाले तर नायकू वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ मिरज येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

मल्हारी वाघमोडे आणि नायकू वाघमोडे हे दोघेही मिरजेहून मंगळवारी रात्री एक वाजता दोन मोटारसायकलवरून घरी येत असताना खंडोबा मंदिर ते लक्ष्मीवाडी दरम्यान अज्ञात बेफाम वाहनाने दोन्ही मोटारसायकलीने ठोकरल्याने नायकू वाघमोडे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले.