Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Belgaon › आत्मशक्‍ती, राष्ट्रभक्‍ती जागवा

आत्मशक्‍ती, राष्ट्रभक्‍ती जागवा

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 10:58PMबेळगाव ः प्रतिनिधी

प्रत्येक क्षेत्रात महिलांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. समाज बदलण्याच्या प्रक्रियेत महिलांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यासाठी महिलांनी आत्मशक्ती व राष्ट्रभक्ती जागवली पाहिजे, असे मत मान्यवर महिलांनी व्यक्त केले.

दैनिक ‘पुढारी’ने कर्तृत्त्ववान महिलांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी महिलाराज ही पुस्तिका संपादित केली असून, तिचे प्रकाशन मान्यवर महिलाच्या हस्ते ‘पुढारी’च्या कॉलेज रोडवरील कार्यालयात झाले. त्यावेळी मान्यवर महिलांनी वरील मत व्यक्त केले.

‘पुढारी’ने मराठी भाषा व संस्कृती जपून ठेवण्याचे काम नेटाने चालविलेे आहे. लेखणीच्या माध्यमातून महिलांना संधी देण्याचे कार्य सुरूच आहे. यापुढेही समाजातील तळागाळातील महिलांचे कार्य समाजासमोर यावे, पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सीतव्वा जोडट्टी यांच्यासारख्या महिलांना स्थानिक प्रसारमाध्यमांनीही प्रसिद्धी द्यावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. आरक्षण नको, कर्तृत्त्वाला वाव मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त झाली.

प्रकाशन समारंभाला डॉ. सोनाली सरनोबत, जिजामाता बँक चेअरपर्सन अश्‍विनी बिडीकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, अश्‍वगंधा कुगजी, गीता पाटील, माजी ता. पं. सदस्या  धनश्री सरदेसाई, दीपाली तोरगलकर, अमृता कारेकर, बालभवनच्या अध्यक्षा डॉ. अंजली निंबाळकर, यमुना कुट्रे, अ‍ॅड. सुषमा बेंद्रे (निपाणी), रुक्मिणी निलजकर, जयश्री पारळे उपस्थित 
होत्या. 

निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी प्रास्ताविकात महिलाराज पुस्तिकेमागची कल्पना विशद केली. त्याचबरोबर प्रतिभा शोधण्यात आणि प्रतिभेला वाव देण्यात आपण भारतीय कमी पडतो, म्हणूनच अमर्त्य सेनसारख्या भारतीयाचा आधी जग गौरव करते, मग आपण गौरव करतो. हे चित्र बदलले पाहिजे, असे मत मांडले. 

व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे, वितरण व्यवस्थापक अमर पाटील, प्रतिनिधी शशी बेळगुंदकर, महेश पाटील यांनी स्वागत केले.  सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले.