Tue, Apr 23, 2019 22:00होमपेज › Belgaon › महात्मा गांधी सर्वश्रेष्ठ नेता

महात्मा गांधी सर्वश्रेष्ठ नेता

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 1:55AM- रंगनाथ पोतदार, माजी नगरसेवक 

अमेरिकेतील टाईम मासिकाने जगातील 25 महनीय नेत्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये महात्मा गांधी अग्रस्थानी होते. म. गांधींची महत्ती यातून स्पष्ट होते. गांधीजींनी दाखविलेल्या शांतीपूर्ण मार्गाची प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. लढा यशस्वी केला. गांधीजी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले नेते होते. हिंदुस्थानच्या 40 कोटी जनतेने त्यांना नेता म्हणून स्वीकारले. ‘अनेकता मे एकता’ हे त्यांचे स्वप्न होते. काशी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते म्हणाले, शिक्षण फक्त चांगल्या नोकर्‍या मिळविण्यासाठी नसते. तर माणसांने आयुष्यभर ताठ कण्याने वावरावे, यासाठी असते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णियांना गोर्‍याप्रमाणेच समान हक्‍क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 1896 साली भारतात परतल्यानंतर काँगे्रसच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी द. आफ्रिकेतील वर्णभेदाच्या लढ्याची माहिती दिली. 

 गांधीजी 1924 साली बेळगावात भरलेल्या अ. भा. काँग्रेस अधिवेशनाचे आपल्या हयातीत एकदाच अध्यक्ष झाले. याची आठवण म्हणून शिवाजी उद्यानाशेजारी त्यांचा स्तूप व टिळकवाडीतील पंपा सरोवर (काँग्रेस विहीर) उभारली आहे.  1939 साली लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत त्यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावले, जेव्हा अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विजय पदरी पडेल तेंव्हाच काँग्रेस समाधानी होईल.  गांधीजींची 30 जाने. 1948 रोजी सायं. 5 वा. 19 नथुराम गोडसे यानी गोळ्या झाडून हत्या केली. गोडसे सुरुवातीच्या काळात गांधींचे अनुयायी होते. नथुराम म्हणतो, देशासाठी गांधीजींनी कष्ट घेतले हे मी केव्हाही मान्य करीन. 

म. गांधीरुपी महामानवाला विनम्र अभिवादन.