Sat, Nov 17, 2018 03:42होमपेज › Belgaon › म. ए. समितीचे मनोहर भातकांडे यांचे निधन

म. ए. समितीचे मनोहर भातकांडे यांचे निधन

Published On: Jun 22 2018 12:43PM | Last Updated: Jun 22 2018 12:43PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पांगुळ गल्लीतील ज्येष्ठ सरपंच मनोहर  महादेवराव भातकांडे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी चार वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भातकांडे हे  माजी नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.