Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Belgaon › प्रेयसीचा अश्‍लील व्हीडिओ केला व्हायरल

प्रेयसीचा अश्‍लील व्हीडिओ केला व्हायरल

Published On: Feb 02 2018 11:44PM | Last Updated: Feb 02 2018 11:36PMखानापूर : वार्ताहर

प्रेमाच्या पवित्र भावनेला काळिमा फासण्याचा प्रकार खानापूर तालुक्यातील प्रियकराने केला आहे. अल्पवयीन प्रेयसीबरोबर घेतलेला अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून इतरांना पाठवण्याचा लांच्छनास्पद प्रकार त्याने केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी काही जणांनी  प्रयत्न चालवले आहेत.

ती मुलगी अल्पवयीन असून तिने भीतीपोटी कोणासमोरही तोंड उघडलेले नाही. तिच्या पालकांनाही  जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून, खानापूर तालुक्यातील त्या गावातील परिसरातील काहींनी व्हिडीओ आणि फोटो इतरांनाही पाठवले आहेत. नववीत शिकणार्‍या त्या मुलीने या प्रकाराची धास्ती घेतली असून तिने शाळाही सोडली आहे. 

प्रियकराची आणि त्याच्या कुटुंबीयांची त्या गावात तसेच परिसरात दहशत आहे. त्यामुळे कोणीही यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्याचे धाडस केलेले नाही. याआधीही त्या तरुणाने अशा कित्येक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले असल्याचे समजते.