होमपेज › Belgaon › महिपाळगडमध्ये वीज कोसळून महिला ठार

महिपाळगडमध्ये वीज कोसळून महिला ठार

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:45PMचंदगड : प्रतिनिधी

रोपलावणीसाठी भाताचा तरवा  टाकण्यास गेलेल्या महिला वीज कोसळल्याने ठार झाली. तर तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास महिपाळगड (ता. चंदगड) येथे घडली. 
सरिता विठ्ठल मोरे असे मृत  महिलेचे नाव  आहे. तळ्याकडील शेतावर कुटुंबीयांसमवेत भाताचा तरवा टाकण्यासाठी गेली होती. दरम्यान, दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी विजेपासून बचावासाठी सरिता खोपीत गेली गेली असता, वीज पडली आणि सरिता जखमी झाली. या अवस्थेत तिला बेळगाव येथील दवाखान्यात नेण्यात येत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. यावेळी माजी सरपंच तुकाराम मोरे जखमी झाले.तर रेणुका सुतार आणि आनंदी सुरेगावकर  कर्णबधीर झाल्या आहेत.