Sun, Nov 18, 2018 13:51होमपेज › Belgaon › हेब्बाळकर, निंबाळकर यांची उमेदवारी निश्‍चित

हेब्बाळकर, निंबाळकर यांची उमेदवारी निश्‍चित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळूर : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी लक्ष्मी हेब्बाळकर आणि खानापूर मतदारसंघासाठी अंजली निंबाळकर यांची काँग्रेसतर्फे उमेदवारी बुधवारी सायंकाळी निश्‍चित झाली. प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष जी. परमेेश्‍वर यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. बैठकीला 25 जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. त्यांच्याशी सल्लामसलत करुनच प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवार निश्‍चित करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेळगाव ग्रामीणमधून तर राज्य बालभवनच्या अध्यक्षा अंजली निंबाळकर यांना खानापूरमधून उमेदवारी निश्‍चित झाली. अधिकृत घोषणा काही दिवसातच होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली.


  •