Wed, Nov 14, 2018 18:58होमपेज › Belgaon › सेठ, हुक्केरी, जारकीहोळींची उमेदवारी निश्‍चित

सेठ, हुक्केरी, जारकीहोळींची उमेदवारी निश्‍चित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 150 उमेदवारांची संभाव्य यादी तयार करण्यात आली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 
पहिल्या यादीमध्ये लक्ष्मी हेब्बाळकर आणि डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आ. फिरोज सेठ, सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, गणेश हुक्केरी आदींचा समावेश आहे. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच राज्याचा दौरा केला आहे. त्यानंतर दिल्ली येथे होणार्‍या काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 130 ते 150 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांच्या उपस्थितीत ही यादी निश्‍चित झाली आहे.काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये बेळगाव उत्तरमधून फिरोज सेठ, ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, खानापुरातून डॉ. अंजली निंबाळकर, चिकोडीतून गणेश हुक्केरी, अथणीतून प्रभू चिन्नबसवस्वामी, रायबागमधून शाम घाटगे, गोकाकमधून रमेश जारकीहोळी, यमकनमर्डीतून सतीश जारकीहोळी, कित्तूर  बी. एम. इनामदार, रामदुर्ग अशोक पट्टण यांचा समावेश आहे. कारवार मतदार संघातून सतीश शैल, हल्याळ आर. व्ही. देशपांडे यांची नावे निश्‍चित आहे.


  •