Sat, Nov 17, 2018 14:12होमपेज › Belgaon › कोगनोळी नाक्यावर 20 लाख रुपये जप्त

कोगनोळी नाक्यावर 20 लाख रुपये जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोगनोळी टोल नाका येथे उभारण्यात आलेल्या विशेष पोलिस तपासणी नाक्यावर शनिवारी पुन्हा 20 लाखांची रोकड व कार जप्त करण्यात आली. 
हे पैसे गडहिंग्लज तालुक्यातील एका कंत्राटदाराचे असून ते तो मुंबईहून गडहिंग्लजकडे घेऊन जात होता. अरुण रामू सिक्री (रा.शिप्पूर, नेसरी, ता. गडहिंग्लज) असे या कंत्राटदाराचे नाव आहे. कारमधून घेऊन चाललेल्या वरील रकमेबाबत योग्य ती कागदपत्रे न मिळाल्याने  ती रक्कम जप्त करण्यात आली. कारच्या मागील सीटवर एका बॅगमध्ये ही रक्कम असल्याचे दिसून आले. याबाबत सिक्री यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता ती मिळून आली नाहीत.

चौकी पथकाचे  निवडणूक अधिकारी दीपक हरदी, उपनिरीक्षक निंगनगौडा पाटील, भरारी पथकाचे मंजुनाथ करोशी, नारायण नाईक निवडणूक  अधिसूचना कलम 171,123 नुसार  कारवाई केली.  निपाणी ग्रामीण पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल आहे.  

सिक्री हे कंत्राटदार असून त्यांच्या व्यवसायाशी निगडीत ही रक्कम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापूर्वी गुुरुवारी कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे कारमधून नेण्यात येणारी 10 लाखांची रोकड  पकडण्यात आली होती. 


  •