Wed, May 22, 2019 22:52होमपेज › Belgaon › बसखाली दुचाकीस्वार ठार

बसखाली दुचाकीस्वार ठार

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:48PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी बसस्थानका-बाहेरील चिकोडी रोडवर दुचाकीला बसचा धक्‍का लागल्याने दुचाकी बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.प्रवीण आप्पासाहेब खोत (वय 22, रा. वाळकी, ता. चिकोडी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. 

निपाणी आगाराची बस निपाणीहून खडकलाटकडे चालली होती. याचवेळी वाळकी येथील प्रवीण हिरो होंडा सीडी दुचाकीवरून निपाणीहून वाळकीला चालला होता. बस निपाणी बसस्थानकातून बाहेर पडून चिकोडी रोडवरून जात होती. यावेळी प्रवीण दुचाकी बसजवळून पुढे घेण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीचे हँडल बसला लागले व  तो बसच्या मागील चाकाखाली सापडला. बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.