Thu, Jun 20, 2019 06:50होमपेज › Belgaon › कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गाडी घेतली काढून

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गाडी घेतली काढून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी 

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्‍यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिेतेची अंमलबजावणीची सुरूवात खुद्द मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांच्यापासुनच करण्यात आली. आज सकाळी मुख्यमंत्री आपल्‍या सरकारी वाहनातून एका कार्यक्रमाला जात असताना चिक्कबळ्ळापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्‍यांना रस्‍त्‍यातच अडउन त्‍यांचे वाहन ताब्‍यात घेतले. यामुळे खासगी वाहनातुनच मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावे लागले.

आज केंद्रिय निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्‍याने राज्‍यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्‍या लवाजम्‍यासह दुध डेअरी उद्घाटनाच्या कार्यक्रमास निघाले असताना एका तासातचं या आचारसंहितेचा फटका मुख्यमंत्र्‍यांना बसला. चिक्कबळ्ळापूरच्या जिल्‍हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकारी वाहन अडऊन सदर वाहन आपल्या ताब्यात घेतले. यामुळे मुख्यमंत्री साहेबांची चांगलीच पंचाईत झाली. या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला नजाता वाटेतच माघारी फिरावे लागले.

 कर्नाटकात एकाच टप्प्यात विधान सभेची निवडणूक होणार आहे. 17 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असणार आहे. तर 27 एप्रिल ही उमेदवारी अर्ज माघारीची अखेरची तारीख आहे.  12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी आणि 25 रोजी अर्जांची छाणणी करण्यात येणार आहे. त्‍यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्‍याने आजपासून कर्नाटक राज्‍यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ही माहिती दिली आहे.या निवडणूकीसाठी उमेदवारांना 28 लाख रूपयांपर्यंत खर्चाचे बंधन घालण्यात आले आहे. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष देखरेख पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Tags : khanapur district collector take chief minister siddaramaiah car in his custody because of election code of conduct


  •