Wed, Nov 21, 2018 11:17होमपेज › Belgaon › खानापूरचे माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचे निधन 

खानापूरचे माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचे निधन 

Published On: Jan 22 2018 1:38PM | Last Updated: Jan 22 2018 1:38PM खानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुक्याचे भाजपचे माजी आमदार प्रल्हाद कल्लापा रेमाणी यांचे आज सकाळी १०च्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस ते किडणीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बेळगांव येथील के. एल. ई इस्पितळात उपचार सुरु होते.

गेल्या महिनाभरापासून प्रल्हाद रेमाणी यांच्यावर म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तेथे उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तीन  दिवसापूर्वी के. एल. ई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रात्रीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. किडणीची यंत्रणा निकामी झाल्याने आज सकाळी १० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षाचे होते. आज सायंकाळी पाच वा. त्यांचे जन्मगाव झाडनावगा ता. खानापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षातून २००८ साली ते खानापुरातून विधान सभेत निवडून गेले होते.