Sat, Mar 23, 2019 18:51होमपेज › Belgaon › कारवार जिल्हा धुमसताच

कारवार जिल्हा धुमसताच

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

कारवार : प्रतिनिधी  

परेश मेस्ता या हिंदुत्ववादी तरुणाच्या हत्येमुळे कारवार किनारपट्टी धुमसत कुमठा, होन्नावर, कारवारमधील दंगलीनंतर आज दुसर्‍या दिवशी ‘शिर्शी बंद’ला हिंसक वळण लागले. होन्नावरमधील परेशच्या मारेकर्‍यांना त्वरित ताब्यात घ्या, अशी मागणी घेऊन मंगळवारी शिर्शी बंदची हाक देण्यात आली होती. मोर्चात सहभागी झालेले आ. विश्‍वेश्‍वर हेगडे-कागेरी, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या नेत्यांना झालेल्या अटकेमुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोर्चेकर्‍यांवर लाठीमार तसेच  हवेत गोळीबार करण्यात आला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.  दगडफेकीत काही पोलिस जखमी झाले आहेत.