Tue, Mar 26, 2019 20:07होमपेज › Belgaon › कारवार पालिकेचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात 

कारवार पालिकेचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात 

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:14AMकारवार : प्रतिनिधी

घराचा उतारा देण्यासाठी 4 हजार  रुपयांची लाच स्वीकारताना कारवार नगपालिका कार्यालयातील  दोन कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी  (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. या घटनेने कर्मचारीवर्गात खळबळ माजली आहे.

 जी. टी. सुरेश व उल्हास बांदेकर दोघेही रा. कारवार अशी कर्मचार्‍यांची नावे असून हे दोघे कारवार नगरपालिकेत कर वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.संदेश  नामक तरुणाने आपल्या   घराचा उतारा मिळविण्यासाठी कारवार नगरपालिकेत अर्ज केला होता. उतारा देण्यासाठी कर्मचारी सुरेश व उल्हास यांनी संदेश यांच्याकडे 5 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, संदेश यांनी 4 हजार रुपये देण्याचे सांगून  एसीबीकडे तक्रार केली होती.