Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी आज मुंबईत बैठक

सीमाप्रश्‍नी आज मुंबईत बैठक

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 26 2018 12:14AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नासाठी कार्यरत असणार्‍या तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक आज गुरुवार 26 रोजी सकाळी 10.30 वा. मंत्रालयात आयोजित केली आहे. बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीकडे सीमाबांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

बैठकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यापूर्वीच मुंबईला गेले आहेत. बुधवारी मुंबई परिसरात मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने बंद पुकारण्यात आल्याने प्रकाश मरगाळेंसह अन्य पदाधिकारी विमानाने मुंबईला रवाना झाले. 

तज्ज्ञ समितीची बैठक प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी न्यायालयीन कामकाजासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असून अन्य बाबींबाबत चर्चा अपेक्षित आहे.
याचबरोबर सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षणात आवश्यक असणार्‍या दाखल्यावरील ‘वादग्रस्त’ उल्लेख हटविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीतील चर्चेकडे सीमाबांधवाचे लक्ष लागून राहिले आहे.