Sun, May 26, 2019 09:15होमपेज › Belgaon › पवारांच्या सभेतून सीमालढ्याला गती

पवारांच्या सभेतून सीमालढ्याला गती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सीमालढ्यामध्ये सामान्य मराठी माणसाने दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांच्या त्यागातूनच हा लढा धगधगत असून येत्या काळात त्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे. सीमालढा पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी सभेचे आयोजन केले असून सभेतून सीमालढ्याला गती येईल, त्यासाठी सभा आयोजिण्यात आली आहे, अशी माहिती मराठी नेत्यांनी दिली. 

सीपीएड मैदानावर मध्यवर्ती म. ए. समितीने आयोजित केलेल्या सभेच्या मंडपाची मुहूर्तमेढ बुधवारी रोवण्यात आली. तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, प्रकाश पाटील, महादेव पाटील यांच्या हस्ते पूजा झाली. 

निंगोजी हुद्दार म्हणाले, 31 रोजी होणारी सभा सीमालढ्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. सीमालढ्यातील हा एक ऐतिहासिक क्षण असून याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो मराठी बांधव एकवटणार आहेत. 

प्रकाश मरगाळे म्हणाले, सभेचे आयोजन केल्यामुळे सीमाभागात उत्साह संचारला आहे. मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा दाखविण्यासाठी सभेला मोठ्या संख्येला उपस्थित राहणार आहे.

मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, नगरसेवक अनंत देशपांडे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, विकास कलघटगी, राजू मरवे, गणेश दड्डीकर, राजू किणयेकर, बाळासाहेब फगरे उपस्थित होते. 

कल्लेहोळ, बेकिनकेरे येथे जागृती

कल्लेहोळ, बेकिनकेरे भागात जागृती मोहीम राबविण्यात आली. समितीच्या सभेला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


  •