Wed, Mar 27, 2019 06:09होमपेज › Belgaon › सीमाभागात जिल्हा प्रशासनाची ठोकशाही; मराठी नेत्यांची खंत

सीमाभागात जिल्हा प्रशासनाची ठोकशाही; मराठी नेत्यांची खंत

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:42AMबेळगुंदी : प्रतिनिधी

एकीकडे भारतीय लोकशाहीचे जगभरात गोडवे गायले जातात. लोकशाहीमुळे जनतेला न्याय मिळाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सीमाभागात लोकशाही बेपत्ता आहे, तर ठोकशाहीचे साम्राज्य आहे, अशी टीका मराठी नेत्यांनी केली आहे.

बेळगुंदी येथील हुतात्मा चौकात बुधवारी कन्‍नड सक्‍तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना म. ए. समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मनोज पावशे म्हणाले, मराठी माणसाला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न प्रशासन करते. मराठी भाषा अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो. कन्‍नडसक्‍ती विरोधासाठी आंदोलन छेडूनदेखील त्यामध्ये दररोज भर पडत आहे. 
म्हात्रू झंगरूचे म्हणाले, सीमाप्रश्न सोडवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची असून त्यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष त्वरित लावावा.

एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनीही श्रद्धांजली वाहिली. माजी आ. बी. आय. पाटील, म्हात्रू झंगरूचे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे पूजन झाले.

यल्लाप्पा बेळगावकर, नाना पाटील, बी. एस. पाटील, ओमाण्णा मोरे, निंगाप्पा पाटील, अशोक गावडा, म्हात्रू झंगरूचे, महादेव हिंडलगेकर, देवाप्पा शिंदे, नाना कंग्राळकर, आप्पाजी गावडा, सुभाष हादगल, कासीम शहापूरवाले, गोविंद चव्हाण, शट्टूपा चव्हाण, अमृत गावडा, मल्लाप्पा पाटील, रामा जांबोटकर आदी उपस्थित होते.

 शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन केले. यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, रिक्षा सेना संघटक विजय मुरकुटे, प्रविण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे,सुनिल पाटील, पिराजी शिंदे, राजू तुडयेकर, बाळासाहेब डंगरले,विजय सावंत आदी उपस्थित होते.