Fri, May 24, 2019 20:53होमपेज › Belgaon › हलग्यात बंडखोरांना प्रवेशबंदी

हलग्यात बंडखोरांना प्रवेशबंदी

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:59AMबेळगाव : प्रतिनिधी

हलगा येथे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत बंडखोर उमेदवारांना प्रवेशबंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
मराठी हितासाठी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. माघार न घेतल्यास त्यांना गावामध्ये प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांची बैठक सोमवारी रात्री पार पडली. 

बेळगावात झालेल्या सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार मध्यवर्ती म. ए. समितीने घटक समितींकडून आलेल्या नावांची चर्चा करून अधिकृत  उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्या उमेदवारांचे सीमा प्रश्‍नाच्या लढ्यात योगदान आहे. मात्र, त्यांच्याविरोधात बंडखोर उमेदवारांनी प्रचार चालविला आहे. तो वेळीच रोखावा आणि निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

बैठकीला मारुती कामती, महेश बिळगोजी, विनोद कामती, सतीश चौगुले, रामा बिळगुचे, सदानंद बिळगोजी, जोतिबा कानोजी, सचिन बिळगोची, मनोहर सताजी आदी उपस्थित होते.