Sat, Nov 17, 2018 18:33होमपेज › Belgaon › कर्नाटक : सीमाभागात भाजप अाघाडीवर

कर्नाटक : सीमाभागात भाजप अाघाडीवर

Published On: Sep 03 2018 1:22PM | Last Updated: Sep 03 2018 3:38PM बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा काँग्रेसने बाजी मारली आहे. १०२ नागरी स्वराज्य संस्थांपैकी ४४ संस्थांवर काँग्रेस सत्तारूढ झाली आहे, तर भाजपला ३५ स्थानिक स्वराज संस्थांमध्ये बहुमत मिळवता आले. राज्य सरकारमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या निधर्मी जनता दला १३ संस्थांची सत्ता हस्तगत करता आली आहे. कर्नाटकात यंदा प्रथमच मतदान यंत्राद्वारे पालिकांसाठी मतदान झाले.

 सीमाभागासाठी महत्त्वाच्या असलेल्या निपाणी पालिकेवर काँग्रेस आणि भाजपने जवळ समसमान जागा मिळवल्या आहेत. भाजपला १३ तर काँग्रेसला १२ जागा मिळवता आल्या. एकूण ३१ जागांपैकी सहा जागा अपक्षांनी  जिंकल्या आहेत.

सीमाभागासाठी दुसरी महत्वाची स्थानिक स्वराज संस्था असलेल्या चिक्कोडी नगरपंचायतीमध्ये एकूण २३ जागांपैकी १३ जागांवर भाजपने विजय मिळवला तर दहा जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत.