Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Belgaon › गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणूक निकालासाठी मंगळवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी आरपीडी कॉर्नरवर गर्दी केली होती. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीने भर उन्हात देखील कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरुच होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये पार पडली. 

सकाळी 8 पासून मतमोजणी केंद्राकडे कार्यकर्त्यांचे ताफे निघाले होते. गुलाल आमचाच असा संदेश देऊन कार्यकर्ते विजयोत्सवाच्या तयारीनिशी मतदान केंद्राबाहेर पोहचले. मोजणी सुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांची चलबिचल सूरू झाली होती.  टप्प्याटप्प्याने निकाल जसा बाहेर पडत होता. तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.  गुलालाची उधळण केल्याने सर्व कार्यकर्ते, रस्ते गुलालाने माखले होते. रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नव्हता. आपल्या उमेदवाराचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जमले होते. उमेदवारांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या.

विविध पक्षांचे फडकणारे झेंडे  विजयाची साक्ष देत होते. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर आनंदोत्सव दिसून आला. पराभूत उमेदवारांच्या गोटात नाराजीचा सूर दिसला. या निडणूकीत मतदारांनी काही ठिकाणी जुन्यांना नाकारले तर काही ठिकाणी नव्याने संधी दिली. 

निकाल निश्‍चित नसल्याने अनेकांने जल्लोषाची तयारी केली नव्हती.  टप्प्याटप्प्याने जशी माहिती येत गेली त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत होत गेला. जसा निकाल लागत गेला तशी गुलालाची पोती उधळली आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलालाबरोबर भगवा रंगदेखील अनेक कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केल्यानंतर साजरा करण्यासाठी आणला होता.  गुलालाची उधळण झाल्यामुळे रस्त्यांवर गुलालाचा खच पडला होता. 

निकालास्थळी हर हर मोदी
जनमत अंदाजात मागे असलेल्या भाजप सरकारने अंतिम निकालात मात्र मुसंडी मारत 103  जागांवर कब्जा केला. बेळगाव जिल्ह्यात यंदा कोणत्याच पक्षाला निकालाचा अंदाज नव्हता. मात्र, दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारल्याने निकालाच्या ठिकाणी ‘हर हर मोदी आणि घर घर मोदी’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्तेही उत्साहाने जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी अबकी बार, मोदी सरकार अशाही घोषणाही देण्यात येत होत्या.