होमपेज › Belgaon › प्रकाश मरगाळे, संभाजी पाटील यांचे अर्ज दाखल

प्रकाश मरगाळे, संभाजी पाटील यांचे अर्ज दाखल

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:41AMबेळगाव ः प्रतिनिधी

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उत्तर मतदारसंघातून संभाजी पाटील यांनी अर्ज सादर केला.

शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी केले. त्यानंतर आरटीओ चौकातील मारुती मंदिरपासून शक्तीप्रदर्शन करत मनपा कार्यालयात निवडणूक अधिकार्‍याकडे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी म. ए. समिती व संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सुभाष ओऊळकर, ता. पं. सदस्य रावजी पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दशरथ येळ्ळूरकर, बंडू मजूकर, शिवाजी हावळण्णाचे, सदानंद शिनोळकर, विजय कुगदी, हरिभाऊ पाटील, यल्लाप्पा नागोजीचे, गणपती बैलूर, सुरेश रेडेकर, एल. आय. पाटील, दुदाप्पा बागेवाडी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

आ. संभाजी पाटील यांनी मंगळवारी उत्तर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या संभाजी पाटील यांनी शेवटच्या क्षणी समितीमध्ये एकी होत नसल्यामुळे उत्तरमधून अर्ज दाखल केला आहे.

Tags : belgaon, karnataka election 2018, sambhaji patil, appaji margale, BJP, congress